E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
साथरोगात जीवशास्त्र विभागाची भूमिका महत्त्वाची
Wrutuja pandharpure
14 May 2025
डॉ. सुवर्णा जोशी यांचे प्रतिपादन
पुणे
: साथरोगात जीवशास्त्र विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. संसर्गाचा शोध घेण्यापासून ते चाचण्यांचा अहवाल देण्यापर्यंत प्रयोगशाळेत कार्य करावे लागते. त्यामुळे सुक्ष्मजीवशास्त्र असे नाव असले, तरी या विभागाचे कार्य सुक्ष्म नाही. अनेक संकटाचा सामना करत तसेच येणार्या प्रत्येक आवाहांना तोंड देत जीवशास्त्र विभागाला साथरोग काळात कर्तव्य बजावत रहावे लागते. असे प्रतिपादन ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा जोशी यांनी मंगळवारी केले.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रातील सारंग साठे स्मृती व्याख्यानात ‘साथीच्या रोगांचे निदान आणि माझा प्रवास’ या विषयावर डॉ. जोशी बोलत होत्या. डॉ. जोशी म्हणाल्या, कोरोना काळात जसा संसर्ग वाढत गेला. त्या प्रमाणात चाचण्यांची संख्याही वाढत गेली. त्यामुळे प्रयोग शाळेत क्षमतेपेक्षा अधिक चाचण्या करून त्याचा रोजच्या रोज अहवाल द्यावा लागत होता. एकीकडे चाचण्यांसाठी आवश्यक सामुग्रीचा तुटवडा जाणवत होता. तर दुसरीकडे रूग्णांची तसेच चाचण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळात सलग १६ तास काम करावे लागत होते. प्रयोगशाळेची प्रमुख म्हणून कोरोना काळात ८१० दिवस सुट्टी घेता आली नसल्याचेही डॉ. जोशी यांनी नमूद केले.
अचानक कोरोना बांधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे प्रारंभीच्या काळात प्रयोगशाळेत चाचणी सामुग्रीचा तुटवडा जाणवला. लॉकडाऊनमुळे ही सामुग्री उपलब्ध करून घेणे हे मोठे आवाहन होते. कुशल कामगारांचा तुटवडा होता. त्यामुळे प्रयोगशाळेतील अधिकार्यांसह कर्मचार्यांना प्रथमच २४ तासांच्या पाळीत काम करावे लागले. त्यामुळे रात्री उशीरा कामावरून सुटल्यानंतर अनेक कर्मचार्यांना घरी पोहचण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र प्रत्येक अडचणीतून मार्ग काढत कोरोना काळात प्रवास करावा लागला. त्यातून प्रयोगशाळेतील अधिकारी तसेच कर्मचार्यांनाही खुप शिकायला मिळाले. आज कोरोना संपला असला, तरी कोरोनासह अन्य साथ रोगांच्या चाचण्यांचे काम सुरूच आहे. त्यावर विविध प्रकारे अभ्यास केला जात असल्याचेही डॉ. सुवर्णा जोशी यांनी सांगितले. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या उपाध्यक्षा सरिता साठे यांनी डॉ. सुवर्णा जोशी यांचा सत्कार केला. मनीषा शेडगे यांनी सुत्रसंचालन केले.
Related
Articles
भारतीय महिला फलंदाज स्मृती मंधाना हिने घेतले केसरीवाडा गणपती बाप्पाचे दर्शन
05 Jun 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
अमेरिकेकडून १२ देशांवर प्रवास बंदी,७ देशांवर कडक निर्बंध
05 Jun 2025
पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहिंदर कुमारचे दोन्ही पाय कापले
30 May 2025
वृक्षाथॉन मॅरेथॉनमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
31 May 2025
सफाई कर्मचार्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी डाटा बेस तयार करा : डुडी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी